कुष्टरोगी जनाबाईच्या कुतुम्बीयांचे जागृत युवा मंच कडून सांत्वन
चंद्रपूर ते वळसा प्रवास करत असताना 'ती' नेहमीच ट्रेन मधे भेटायची. अंगावर फाटका पातळ, एक चीरोटी डोक्याला बांधलेली, पोटाला भाकर आणि अंगावर कापड मिळाव म्हणून कुणी दोन पैसे देईल, ह्या अपेक्षेने एका डब्यातून दुसऱ्या डब्यात तिचा प्रवास सुरु असायचा. ती कुष्टरोगी असल्यामुळे एकेकाळी आमटे दाम्पत्याशी उपचारादरम्यान तिची नाळ जोडल्या गेली होती. मीही नेहेमीचा प्रवासी असल्यामुळे तीच्या हातात दहा पाच रूपये देऊन मला मोकळ होता यायचे. अशाच गाटि भेटितून झालेली तिची माझी ओळख.! ती कधी वेळ काढून जवळ बसायची आणि आपल्या कुटुम्बाविषयी सांगत बसायची. परवा भेटली तेंव्हा डोळ्यात पानी घेउन उरातल दुखः सांगत होती, सहन करतेय म्हणे स्वतःच्या तब्वेतीचा स्वतःलाच होणारा त्रास..! तीच दुखः तुमच्या आमच्या पेक्षा काही वेगळं नसलं तरीही वेगळंच म्हणवून घ्याव लागेल. ''आता नाही करवून होत हे सारं. त्रास होत अश्या जगण्याचा'', ती सांगत होती . सकाळी सहा वाजता तिची दिनचर्या सुरु होते आणि संध्याकाळी सहा वाजता ती घरी परतते. ती बोलली, ''ये एकदा मझ्या घरी.. भिकारडीण म्हणून येऊ ...