Posts

Showing posts from August, 2017
Image
दि. 31/08/2017 ड्रा नैताम मॅडम,  आलापल्ली यांनी जागृत युवा मंच च्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन एकूण 17 ज्ञानवर्धक पुस्तक गरजू साठी दान केल्याबद्दल त्यांचे जागृत युवा मंच तर्फे विशेषभार.
Image
 दि.30/08/2017 मा. श्री सुरेशजी दोंतुलवार सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक,चेरपल्ली (रा.अहेरी) यांनी जागृत युवा मंचच्या पुस्तक दान कार्यक्रमात सहभागी होऊन 13 पुस्तकं (ज्ञान वर्धक व शैक्षणिक) दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार. पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी  
Image
आज दि. 29/08/2017 छाया उईके मॅडम यांनी जागृत युवा मंचच्या #पुस्तक_दान_कार्यक्रमात सहभागी होऊन आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने लेखक-ओहोळ डी. आर. तब्बल 12 पुस्तक दान केल्याबद्दल जागृत युवा मंच तर्फे विशेष आभार.  पुस्तक स्विकारताना जागृत युवा मंच चे पदाधीकारी 

*भव्य पुस्तक दान कार्यक्रम* एक हात मदतीचा...

Image
आज आम्ही आपल्याकडे एक मदतीचा हात मागण्यासाठी येत आहोत. आम्ही सर्व सामाजिक प्राणी आहोत. आमचं जगणं एकमेकांवरच निर्भर करतं. अन्न,वस्त्र,निवारा ह्या मानवाच्या प्रमुख मूलभूत गरजा आहेत. पण आता जगण्याची व ह्या गरजांची व्याख्या बदलायला हवी असं आम्हाला वाटू लागलय. वाचन हे सूद्धा एक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कारण जगण्यासाठी स्पर्धेत उतराव लागतं आणि स्पर्धेत टिकण्यासाठी आधी पुस्तकं वाचावी लागतात ही वास्तविकता आहे. आज स्पर्धेचा युग आहे त्यामुळं विद्यार्थी स्पर्धेत उतरलेत. आपल्या जिल्ह्यात खोलवर नजर टाकली की आपल्याला शिक्षणाच्या दुनीयेतली पुस्तकाचं छत्र हरवलेली बरीच स्पर्धक सापडतील. त्यांच्या केवीलवान्या डोळ्यांत निरखून कधी बघितलात की ती आपलीच बांधव असलेलं लक्षात येईल. त्यांना पुस्तकं वाचण्याची आवळ आणि गरज आहे पण ती विकत घेण्यासाठी मात्र पैसे नाही. मग अशाच भावंडांसाठी आम्ही एक हात मदतीचा पुढे करूयात. स्पर्धा परीक्षा देऊन मोठ्या पदावर गेलेली बरीच लोक आमच्यात आहेत. त्यांची जुनी पुस्तकं कुठल्यातरी कपाटावर धुळींत  जमा असतील. ती पुस्तकं तुम्ही आम्हाला तुमच्या हातांनी सूपूर्त करा. ती पुस्तकं आम्ह...

*जागृत युवा मंचचा अनोखा उपक्रम.. *मतीमंद व मुकबधिर मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन...!!!

Image
जागृत युवा मंच च्या वतीने चाणक्य मतीमंद निवासी विद्यालय व एकलव्य मूकबधिर निवासी विद्यालय,नागेपल्ली येथे एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. जीवनप्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना रक्षाबंधन सण अनुभवता यावा ह्याकरीता मैत्रीच्या नात्याबरोबरच बहीण भावाच्या अतूट बंधनाने जागृत युवा मंचचा परिवार एकत्र आला. बहीण भावाचे अतूट नाते अनुभवता यावे म्हणून जागृत युवा मंचच्या मुलींनी मतीमंद व मूकबधिर मुलांना राख्या बांधल्या. व जागृत युवा मंचच्या मुलांनी त्यांच्या कडून बांधून घेतल्या. मुलांना याप्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले.अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे विद्यालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जागृत युवा मंचने मतीमंद व मूकबधिर मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अपुलकीची व जवळीकतेची प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केली व मुले स्वतःचे पालक आल्याप्रमाणे आनंद व्यक्त करत होते. जागृत युवा मंचचा परिवार जाण्यास बाहेर पडटाच "नका जाऊ" असं म्हणून त्या मुलांनी जागृत युवा मंचला आडवून धरल होतं. ह्या वातावरनाने विद्यालयातील शिक्षक सूद्धा भारावून गेले. कार्यक्रमा प्रसंगी जागृत युवा मं...