*अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित*
झाडीपट्टी कलावंतांच्या समस्या लक्षात घेता वडसा येथे अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. झाडीपट्टी रंगभुमीला लगभग दीडशे वर्षाचा सुवर्ण इतिहास आहे. विदर्भाची झाडीपट्टी रंगभूमी म्हणजे भविष्यातील सिनेमा सृष्टी म्हणायला हरकत नाही. परंतु कोरोना काळापासून कलावंताच्या अनेक समस्या पुढे येत आहेत त्यामुळे कलावंताच्या समस्या निकाली काढण्याकरिता,शासन दरबारी कलावंताची नोंद व्हावी याकरिता, शासकीय योजनाचा लाभ झाडीपट्टीतील कलावंताना मिळावा हे उद्दीष्ट्ये व ध्येय समोर ठेवून वडसा येथील श्रीराम मंदीरात अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित करण्यात आली. परिषदच्या अध्यक्ष पदी प्रा शेखर पटले यांची निवड करण्यात आली तर सचिव पदी मुकेश गेडाम,उपाध्यक्ष पदी किरपाल सयाम गडचिरोली, प्रियंका गायधने गोंदिया,किशोर भाग्यवंत भंडारा,देवा कावडे चंद्रपूर यांची निवड करण्यात आली,सहसचिव पदी दुधराम कामडी भंडारा, ज्ञानेश्वरी कापगते गोंदिया,वासूकुमार गडचिरोली, सुनिल कुकुडकर चंद्रपूर, तर कोषाध्यक्ष पदी शंतनू कुडमेथे,प्रसिद्धी प्रमुख पदी राहुल पेंढारकर, होमदेव कोसमशिले मंगल मशाखेत्...