Posts

Showing posts from September, 2023

उमगल्या भटक्या-विमुक्तांच्या यातना...

Image
-चंद्रपुरात 'यातना' नाटकाचा यशस्वी प्रयोग.. चंद्रपूर/ आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर प्रस्तुत. मायबोली झाडीपट्टी रंगभूमी निर्मीत, राहुल पेंढारकर लिखीत ' यातना ' या नाटकाचा चंद्रपूर येथे यशस्वी प्रयोग पार पडला.  डब्लू. सी. एल. गणेश मंडळ यांच्या सौजन्याने नाट्यप्रयोगाचे निःशुल्क आयोजन करण्यात आले होते. गणेश चतुर्थी पासून तर गणेश विसर्जन पर्यंत गणेश मंडळ अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असते. औचित्य साधून सदर नाटकाचे निःशुल्क प्रयोग आयोजित करण्यात आले. प्रसंगी भर पावसात नाटकाला हजेरी लावून, रसिक माय बापांनी त्यांचा नाटकाविषयीचा जिव्हाळा प्रकट केला. गणपती - पोळा - दिवाळी पासून झाडीपट्टीच्या नाटकांची सुरुवात होते. येथील नाट्य रसिकांसाठी नाटक म्हणजे सुगीचा दिवस असतो. त्यामूळे रसिकांनी नाटक संस्कृती जोपासावी, असे लेखक राहुल पेंढारकर यांनी प्रेक्षकांशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. नाटकाचे निर्माता सारिका यश. उराडे, दिग्दर्शक संतोष बारसागडे असून, सिने. अभिनेत्री निशा धोंगडे, राहुल पेंढारकर, संतोष बारसागडे, यश निकोडे, बि. अनिरुद...

चंद्रपुरात पार पडले पाहिले वैदर्भीय कलावंत सम्मेलन!

Image
 -वैदर्भीय कलावंत संमेलनात विदर्भातील अकारा जिल्ह्यातील कलावंतांची उपस्थिती.      झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील नाटयपंढरी म्हणून ओळखली जाते. विदर्भात सर्वात जास्त मनोरंजन कर हा झाडीपट्टी रंगभूमीमधूनच राज्य शासनाला प्राप्त होतो. तरीही झाडीपट्टी रंगभूमी ही ग्रामीण आदिवासी बहुमुलखातील हौशी रंगभूमी असल्यामुळे येथील कलावंत मुंबई - पुण्यापर्यंत कधीच पोहचू शकला नाही. येथील ग्रामीण कलावंतांच्या कलेला जागं करुन वैदर्भीय लोककला जिवंत ठेवण्याचे काम मायबोली झाडीपट्टी रंगभूमी गेली दोनशे वर्षा पासून करीत आहे.       येथिल हौशी कलावंतांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कलेला प्रसिद्धी मिळावी, स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ निर्माण व्हावे, या हेतूने दिनांक पाच सप्तेबर रोजी  चंद्रमणी नॅशनल पार्क येथे पहिले 'वैदर्भीय कलावंत संमेलन' आयोजीत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला विदर्भातील अकरा जिल्ह्यातील कलावंत हजारोच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार किशोरभाऊ जोरगेवार तथा पद्मश्री डॉ.परशुराम खुने यांचे हस्ते पार पडले, तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. इसादासजी भडके, पमा...

' कुरमाघर' मराठी - गोंडी नाटक

Image
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींच्या ' कुर्मा' प्रथेवर आधारीत दोन अंकी मराठी- गोंडी नाटक ' कुरमाघर...!'

आलापल्ली येथे अभिनय, लेखन, दिग्दर्शन कार्यशाळा

Image
आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ तर्फे अभिनय,लेखन, दिग्दर्शन, कार्यशाळा