*झाडीपट्टी नाटकांच्या परवानगीचे स्वतंत्र अध्यादेश जाहीर करा* -राहुल पेंढारकर, संतोष बारसागडे यांची मा. मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने कोरोना संदर्भात सर्व शासकीय नियम पाळून नाट्य प्रयोग सादर करण्याचे आश्वासनावर महाराष्ट्रातील नाट्यगृह उघडण्याविषयी मा. मुख्यमंत्र्याना निवेदन दिले. शिष्टमंडळाशी विचारविनिमय करून रंगभूमी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील नाट्यगृह ५ नोव्हेंबर रोजी उघडण्याचे आदेश मा. मुख्यमंत्र्यानी शासकीय अधिकारी आणि विभागांना दिले आहेत. परंतु विदर्भाच्या पूर्वेस असलेली झाडीपट्टी रंगभूमी ही स्वतंत्र आणि समृद्ध असून खुले रंगमंच असलेली रंगभूमी आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाची परवानगी मिळविताना संबंधित अधिकाऱ्याकडून नाट्यकलावंताना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. झाडीपट्टी रंगभूमीचे मुख्यालय गडचिरोली जिल्ह्यातील वडसा येथे आहे. येथे 55 पेक्षाही अधिक नाटकाचे गृप आहेत. निर्माता, कलावंत, लेखक, दिग्दर्शक, नैपथ्यकार, वाहन चालक, पेंडाल वाले, पार्श्वसूचक यांचे पोट झाडीपट्टीच्या नाटकानांवर चालते. कोरोना काळात अनेकदा पोलिस स्टेशन मधून नाट्य प्रयोगाकारिता परवानगी नाकारण्यात येते, तर कधी चक्क पोलिस विभागातर्फे परवानगी मिळाल्या नंत...