Posts

Showing posts from September, 2022

राहुल पेंढारकर यांचा सत्कार

Image
     बिरसा क्रांती दलच्या वतीने चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृहात रावण पूजेचं ओचित्य साधून राहुल पेंढारकर यांचे  'गोंडवन पेटलं आहे' या सामाजिक संगीतमय प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बिरसा क्रांती दलाच्या वतीने राहुल पेंढारकर व संचाचा सत्कार करण्यात आला.           आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळच्या वतीने राहुल पेंढारकर हे आदिवासी समाजात शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक जागृती करण्याकरिता प्रबोधन करत असतात. हया कार्यक्रमासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. त्यांच्या कार्याची दखल घेत बिरसा क्रांती दलाच्या वतीने श्रीफळ व शाल देऊन हा सत्कार करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथजी मडावी संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. उद्घाटक  डॉ. गजानन मेश्राम,माजी वैद्यकिय अधिकारी. प्रमुख अतीथी  रंगराव काळे राज्य अध्यक्ष, बिरसा क्रांती दल. गिरजा उईके राज्य अध्यक्ष बिरसा क्रांतीदल महिला फोरम. डि. बि. अंबुरे, राज्य उपाध्यक्ष, बिरसा क्रांती दल.  प्रभा...

*अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेचे सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन. *झाडीपट्टी कलावंतांच्या पाठीशी खंबरपणे उभे रहाणार - सुधीरभाऊ मुनगंटीवार

Image
     राज्याचे सांस्कृतिक मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना अखिल झाडीपट्टी कलावंत परिषदेच्या वतीने निवेदन देण्यात आले. झाडीपट्टी रंगभूमी ही लोककलावंतांची होशी रंगभूमी आहे. येथील कलावंत हा प्रामुख्याने वैदर्भीय मातीतील शेतकरी वर्ग आहे; काळानुरूप रंगभूमीवर अनेक बदल होत गेलेत परंतु असे असले तरी येथील कलावंतांचे दिवस अजून बदललेले दिसत नाही. कलावंत पूर्वी ज्या परिस्थितीत होता तसा आजही आहे. झाडीपट्टीचा कलावंत अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहे; परंतु अद्याप येथील रंगभूमीचा विकास झालेला दिसत नाही. त्यामुळे झाडीपट्टी रंगभूमी आणि येथिल कलावंतांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदनातून मागणी करण्यात आल्या.     यामध्ये प्रामुख्याने मागण्या पुढील प्रमाणे आहे. झाडीपट्टीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या वडसा येथे दोन हजार आसनसंख्या असलेले नाट्यगृह ऊभारण्यात यावे. महागाईच्या वाढत्या दराचा विचार करुन जेष्ट कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, नाट्यप्रयोगादरम्यान कलावंतांचा अपघाती अथवा अकस्मात मृत्यु झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची आर्थीक मदत करण्या...

*झाडीपट्टीच्या 'शर्वरी'ची आंतरराष्ट्रीय लघूचित्रपट महोत्सवात भरारी.* लघुचित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद !

Image
चंद्रपूर/        मायबोली झाडीपट्टी प्रॉड्शन्स प्रस्तूत, राहुल पेंढारकर दिग्दर्शीत 'शर्वरी' हा लघुचित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असुन चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. स्किझोफ्रेनिया या मानसिक आजाराचा विषय घेऊन तयार करण्यात आलेले लघुचित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरतांना दिसत असून मुंबा आंतररष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवात लवकरच सादर होणार असल्याची माहिती अभिनेते-दिग्दर्शक राहुल पेंढारकर यांनी दिली आहे.          जगात अनेक प्रकारचे आजार आहेत.आजार केवळ शारीरिकच नसतात, तर मानसिक आजारही बरेच आहेत, जे आपल्याला माहित नसतात किंवा ओळखता येत नाहीत. असाच एक आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया. स्किझोफ्रेनिया एक जटिल आणि गंभीर मानसिक आरोग्याचा विकार आहे, जो मेंदूच्या सामान्य कार्यावर परिणाम करतो. लोकांचे मन भ्रष्ट होऊ लागते, त्यांच्या डोक्यात भ्रामक विचार, उच्छृंखल वर्तन आणि विचार येतात. हा विकार एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करतो आणि त्याला आजीवन उपचाराची आवश्यक असते. उपचार न घेतल्यास मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.    ...