Posts

Showing posts from May, 2022

राहुल पेंढारकर 'विदर्भ भूषण' पुरस्काराने सन्मानित

Image
        कविवर्य सुरेश भट सभागृह रेशिमबाग,नागपुर येथे भाग्यश्री फिल्म नाट्य अकादमीच्या वतीने BFNA सन्मान समारोह पार पडला. अभिनय, नृत्य, संगीत,लेखन, तसेच सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ता तथा झाडीपट्टीचे उत्कृष्ट कलावंत म्हणून कवी व लेखक राहुल पेंढारकर यांचा 'विदर्भ भूषण' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.           राहुल पेंढारकर हे झाडीपट्टी रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक, तथा कलावंत म्हणून सुपरिचित आहेत. 'भ्रूण कन्येचा टाहो' या कविता संग्रहात त्यांची कविता सामाविष्ट आहे. शिवाय विविध विषयावर अनेक वृत्तपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. 'आई जन्माची शिदोरी', 'शोधू कुठे किनारा', 'यातना' अशा सामाजिक नाटकांतून त्यांनी आपल्या लेखणीची छाप झाडीपट्टीच्या रंगभूमीवर सोडली.      सन्मान सोहळा दया शंकरजी तिवारी, पू. महापौर महानगर पालिका नागपुर, आर. विमालाजी, जिल्हाधिकारी नागपुर, मोहनजी मते, विधायक दक्षिण नागपुर, बी. सी. भरतीया, जयप्रकाश गुप्ता, आश्विनजी अग्रवाल, प्...