Posts

Showing posts from October, 2023

धम्मचक्र अनुप्रवर्तन दिना निमित्त निःशुल्क भोजन वितरण

Image
  चंद्रपूर :  सर्वांगीण विकास बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाचे औचित्य साधून निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले. यादिवशी लाखो बौद्ध बांधव विविध जिल्ह्यातून दीक्षाभूमी चंद्रपूर येथे येत असतात, त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, यादिवशी कुणीही उपाशी राहू नये, गरजू जनतेला एका वेळेच्या जेवणाची व्यवस्था व्हावी,म्हणून निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले.        दीक्षाभूमी हे चंद्रपूर शहरातील आणि नागपूरच्या दीक्षाभूमीखालोखाल भारतातील बौद्ध धर्मीयांचे प्रमुख बौद्ध तीर्थस्थळ आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १६ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी आपल्या ३ लाखापेक्षा अधिक अनुयायांना नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. तत्पूर्वी त्यांनी नागपूरच्या दीक्षाभूमी येथे १४ व १५ ऑक्टोबर १९५६ रोजी अनुक्रमे ५ लाख व २ लाख अशा एकूण ७ लाखावर अनुयायांनाही दीक्षा दिली होती. त्यामुळे या दोन्ही स्थळांना ‘दीक्षाभूमी’ म्हटले जाते         वर्षभर बौद्ध अनुया...