Posts

Showing posts from March, 2024

*मार्कंडा येथे यात्रेकरूंना तीन दिवस निःशुल्क भोजन वितरण*

Image
      गडचिरोली  - आदिवासी स्वायत्त परिषद तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरातील परिसरात महाशिवरात्री निमित्त तिन दिवस निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले.                चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते. मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची साधने येथे लावली जातात. त्यामुळे, यात्रेकरूंची जेवणाची गैरसोय होत असते, करिता यात्रेदरम्यान भाविकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी दहा व...

- नाटक हे मानवी जीवनावर लक्ष केंद्रित करून जीवनाचे प्रतिबिंब उमठवीत असतात : माजी जि.प. अजय कंकडालवार

Image
 *यातना नाटकातून उमगल्या भटक्यांच्या यात तालुका प्रतिनिधी / एटापल्ली:  शहरी भागात विविध सामाजिक संस्था व क्रिडा मंडळांकडून नाट्यरसिकांचे मनोरंजनासाठी तसेच समाज प्रबोधन व समाज जागृतीसाठी भिन्न भिन्न नाट्यप्रयोगाचे आयोजन करीत असतात. याच धर्तीवर एटापल्ली येथे विर बाबुराव शेडमाके नाट्य कला मंडळ एटापल्ली यांच्या सौजन्याने राहुल पेंढारकर लिखित दिग्दर्शित मराठी नाटक 'यातना' या नाट्यप्रयोगाचे बंद शामियानात आयोजन करण्यात आले.         प्रसंगी नाटकाचे उदघाटन जि.प. माजी अध्यक्ष, आविस व काँग्रेसचे नेते व अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.       उदघाटक म्हणून उपस्थित नाट्यरसिकांना मार्गदर्शन करतांना अजय कंकडालवार म्हणाले, नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक, काल्पनिक व्यक्ती यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय आणि काव्यात्मकता म्हणजेच नाटक असून नाटकाचे अनेक प्रकार असून यात संगीत नाटकाला आजही अनन्य महत्व आहे, नाटक आणि ग्रामीण समाजाचा विकास हे एक कला प्रकार म्हण...