Posts

Showing posts from May, 2026

भिर भिरणाऱ्या पाखरा संगे

Image
 

नाट्य प्रशिक्षण शिबिर

Image
 *इंडियन ऑइल तथा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचा संयुक्त उपक्रम* *ग्रामीण, आदिवासी बालकलाकारांना दिल्लीचे व्यासपीठ; तीस दिवसीय निःशुल्क नाट्य शिबिराचे आयोजन! अहेरी: अहेरी येथील स्थानिक भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 20 मे ते 20 जून पर्यंत ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ३० दिवसीय निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) नवी दिल्ली, इंडियन ऑइल आणि आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) दिल्ली येथील अनुभवी व राष्ट्रीय स्तरावरील कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शिबिरातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या बालकलाकारांचे नाटक २० जून रोजी थेट दिल्ली येथे सादर केले जाईल. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामु...

पक्षी वाचवा अभियान-2026

Image
  चिमणीची चिवचिव अन् पाखरांची भुर्रर्र... मुलांनो, या निसर्गाच्या गाण्याला हरवू नका! - राहुल पेंढारकर (अध्यक्ष, आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ या संस्थेचा राज्यव्यापी उपक्रम) पहाटेची शांतता भंग करणारी सुरांची मैफल, घराच्या अंगणात दाणे टिपणारी चिमणी, बाल्कनीत घरटं करणारी कबुतरं आणि आकाशात मुक्त संचार करणारे रंगीबेरंगी पक्षी... आजच्या सिमेंटच्या जंगलात हे दृश्य दुर्मिळ होत चालले आहे. निसर्गाचे हे सुंदर घटक आपल्यापासून दुरावत आहेत. पण, महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळकरी मुलांनी आता एक विडा उचलला आहे - 'पक्षी वाचवा'! आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्राच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या या अभियानात पुणे, नागपूर, सातारा, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर अशा विविध जिल्ह्यांतील विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. *पक्षी वाचवा अभियान* : संकल्पना आणि ध्येय या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ पक्षी वाचवणे नाही, तर लहान मुलांमध्ये निसर्गप्रेमाचे बीज रोवणे हा आहे. वाढते शहरीकरण, मोबाईलचा अतिवापर आणि झाडांची कमतरता यामुळे ...