भामरागड येथे पथनाट्य सादर करतांना कलासंच
गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागड तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जमातींच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी भामरागड केंद्रामधे कलापथकाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभाग अंतर्गत अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. त्यात शैक्षणिक योजना, शेतीविषयक योजना, केंद्रवर्ती अर्थ संकल्प योजना अशा अनेक योजनांचा सामावेश होत असतो. भामरागड केंद्रातील अनुसूचित जमातीच्या लोकांपर्यंत पथनाट्य, गोंडी गीत, गोंडी नृत्याच्या माध्यमातून शासकीय योजनांविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच व्यसनमुक्ती, कुपोषण, शिक्षण, स्वयं रोजगार या विषयावर प्रबोधन करण्यात आले. वनभोजन आणि इतर गमतीजमती हेमकसा लोकबिरादरी प्रकल्पाला भेट आदिवासी संस्कृतीचे माडीया नृत्य आदिवासी संस्कृती प्रमाणे लग्नसोहळा जाणून घेताना कलापथक सादर करतांना गावकऱ्यांना शासकीय योजना संदर्भात माहिती देताना ...