Posts

Showing posts from June, 2022

'गाव तेथे वाचनालय' मोहीम' : जागृत युवा मंचचा शैक्षणिक उपक्रम

Image
चंद्रपूर : महाराष्ट्रात वाचन संस्कृती जपण्यासाठी जागृत युवा मंचने 'गाव तेथे वाचनालय' मोहीम हाती घेतली आहे. आज इंटरनेटचया युगात जग प्रगती पथावर आहे. WhatsApp, Facebook, twitter सारखे सामाजिक उपकरण वेग धरू पाहत आहे. अशातच कुठेतरी वाचन संस्कृती लोप पावत असताना दिसते. आजची तरुण पिढी मोबाईलवरील गेम्सच्या आहारी जात आहे. त्यामुळे माणसांवर अनेक दुष्परिणामही जाणवतात. म्हणून सामजिक भान जोपासत. जागृत युवा मंचने स्वखर्चतून चंद्रपूर येथील बाबुपेठ परिसरात वाचनालयाची निर्मिती केली आहे.       जुनी/ नवी पुस्तके भेट देऊन या उपक्रमासाठी मदत करण्याचे आवाहन जागृत मंचच्या वतीने करण्यात आले होते. वर्षा फाऊंडेशन नागपूरच्या वतीने अनेक नवी / जुनी पुस्तकांची मदत या उपक्रमासाठी करण्यात आली. मोठ्या प्रमाणात पुस्तके बघून चाळीतील मुलांनी आनंद व्यक्त केला, कुतूहलाने मुलांनी त्या पुस्तकांना चाळून बघितलं. त्यावरून मुलांना वाचनाची आवड दिसून आली. वाचनालयात कथा संग्रह, काव्यसंग्रह, शैक्षणिक पुस्तकांचा सामावेश करण्यात आला असून रोज सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत हे वाचनालय सुरू राहणार असल्याची माहिती जागृ...