Skip to main content
*जागृत युवा मंचचा अनोखा उपक्रम.. *मतीमंद व मुकबधिर मुलांसोबत साजरा केला रक्षाबंधन...!!!

जागृत युवा मंचच्या वतीने चाणक्य मतीमंद निवासी विद्यालय व एकलव्य मूकबधिर निवासी विद्यालय,नागेपल्ली येथे एक आगळा वेगळा रक्षाबंधन साजरा करण्यात आला. जीवनप्रवाहापासून वंचित असलेल्या मुलांना रक्षाबंधन सण अनुभवता यावा ह्याकरीता मैत्रीच्या नात्याबरोबरच बहीण भावाच्या अतूट बंधनाने जागृत युवा मंचचा परिवार एकत्र आला. बहीण भावाचे अतूट नाते अनुभवता यावे म्हणून जागृत युवा मंचच्या मुलींनी मतीमंद व मूकबधिर मुलांना राख्या बांधल्या. व जागृत युवा मंचच्या मुलांनी त्यांच्या कडून बांधून घेतल्या. मुलांना याप्रसंगी खाऊचे वाटप करण्यात आले.अश्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमामुळे विद्यालयात एक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जागृत युवा मंचने मतीमंद व मूकबधिर मुलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता अपुलकीची व जवळीकतेची प्रतिक्रिया मुलांनी व्यक्त केली व मुले स्वतःचे पालक आल्याप्रमाणे आनंद व्यक्त करत होते. जागृत युवा मंचचा परिवार जाण्यास बाहेर पडटाच "नका जाऊ" असं म्हणून त्या मुलांनी जागृत युवा मंचला आडवून धरल होतं. ह्या वातावरनाने विद्यालयातील शिक्षक सूद्धा भारावून गेले. कार्यक्रमा प्रसंगी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहुल पेंढारकर, सचिन खोब्रागडे, विजेंद्र शील,रवि गज्जलवार,विजय गड्डम्वार,मधुकर अग्गूवार,राकेश रापर्तीवार,संतोष सगडीवार,साजन ऊइके,प्रीतम पेटेवार,मनोज गेडाम,दीपक गुप्ता,प्रिन्स मोर्गोनी,नागेश सिंका,रोशन गुप्ता,फलाश तावाडे,शीवानी बिश्वास,निशा खोब्रागडे,सोनाली भट,विद्या राऊत, रागिनी ऊइके आदि जागृत युवा मंचचे शिष्टमंडळाची उपस्तीत होते.
Comments