*मार्कंडा येथे यात्रेकरूंना तीन दिवस निःशुल्क भोजन वितरण*

    






















गडचिरोली 

- आदिवासी स्वायत्त परिषद तथा आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथील पुरातन हेमाडपंती मंदिरातील परिसरात महाशिवरात्री निमित्त तिन दिवस निःशुल्क भोजन वितरण करण्यात आले. 

              चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा येथे प्रसिद्ध पुरातन हेमाडपंती मंदिर आहे. विशेष म्हणजे, वैनगंगा नदी तिरावर हे मंदिर वसलेले असून दक्षिणवाहिनी वैनगंगा नदी मार्कंडेश्वर मंदिरापासून उत्तरवाहिनी झाली आहे. त्यामुळे, या मंदिराला विशेष महत्त्व आहे. महाशिवरात्रीनिमित्त जवळपास पंधरा दिवस येथे मोठी यात्रा भरत असते. मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर यात्रेकरू इथे दर्शनाला येतात. या काळात इथे लोकांची खूप वर्दळ असते. यात्रेदरम्यान लहान-मोठ्या दुकानांसह अनेक मनोरंजनाची साधने येथे लावली जातात. त्यामुळे, यात्रेकरूंची जेवणाची गैरसोय होत असते, करिता यात्रेदरम्यान भाविकांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी दहा वाजता पासून ते रात्रौ अकरा वाजता पर्यंत, अशी तीन दिवस हजारो यात्रेकरूंसाठी निःशुल्क भोजन वितरण व शुद्ध पाण्याची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली. 

               कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी दिवाकर पेंदाम, राहुल पेंढारकर, टिना उराडे, सुखदेव कंन्नाके, रामचंद्र कातंगे, रवी मसराम, गोवर्धन कुंभारे, प्रशांत भागात, माधव बोरकुटे आदि पदाधीकार्यांनी परिश्रम घेतला.

Comments

Popular posts from this blog

चंद्रपूर येथे ' मोफत कपडा बँक ' चे उद्घाटन -निःशुल्क कपडा वितरणातून गरजूंना मदत..!

नाट्य प्रशिक्षण शिबिर

पक्षी वाचवा अभियान-2026

गावच्या मातीतून उगमणार नवे ' ग्रामीण लोककला केंद्र '

'Kurmaghar', a complete rural drama, will be performed at Zadipatti Theatre

भामरागड येथे पथनाट्य सादर करतांना कलासंच

जागृत युवा मंच च्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना "आईची ब्लँकेट" वितरण..

*अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित*