नाट्य प्रशिक्षण शिबिर






 *इंडियन ऑइल तथा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा दिल्लीचा संयुक्त उपक्रम*

*ग्रामीण, आदिवासी बालकलाकारांना दिल्लीचे व्यासपीठ; तीस दिवसीय निःशुल्क नाट्य शिबिराचे आयोजन!



अहेरी:

अहेरी येथील स्थानिक भगवंतराव हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक 20 मे ते 20 जून पर्यंत ९ ते १५ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी ३० दिवसीय निःशुल्क नाट्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) नवी दिल्ली, इंडियन ऑइल आणि आदिवासी ग्रामीण साहित्य बहुद्देशीय सांस्कृतिक शिक्षण मंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जात आहे.नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) दिल्ली येथील अनुभवी व राष्ट्रीय स्तरावरील कलावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. शिबिरात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शिबिरातील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर, या बालकलाकारांचे नाटक २० जून रोजी थेट दिल्ली येथे सादर केले जाईल. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे स्टेज धाडस, संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी चालना मिळणार आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) ही नवी दिल्ली येथील भारतातील सर्वोच्च नाट्य प्रशिक्षण संस्था आहे, जिचा भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाशी (Ministry of Culture) थेट संबंध आहे. त्यामुळे अहेरी परिसरातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांचा यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन नाट्य शिबिरचे समन्वयक सुहास नगराडे, राहुल पेंढारकर यांनी केले आहे.













Comments

Popular posts from this blog

चंद्रपूर येथे ' मोफत कपडा बँक ' चे उद्घाटन -निःशुल्क कपडा वितरणातून गरजूंना मदत..!

पक्षी वाचवा अभियान-2026

गावच्या मातीतून उगमणार नवे ' ग्रामीण लोककला केंद्र '

'Kurmaghar', a complete rural drama, will be performed at Zadipatti Theatre

भामरागड येथे पथनाट्य सादर करतांना कलासंच

जागृत युवा मंच च्या वतीने मुकबधीर विद्यार्थ्यांना "आईची ब्लँकेट" वितरण..

*अखिल भारतीय झाडीपट्टी कलावंत परिषदेची कार्यकारणी गठित*