Skip to main content
पूर ग्रस्तासाठी सरसावला जागृत युवा मंच - आम्ही हाक देतोय तुम्ही साथ द्या.


महाराष्ट्र राज्यातील पुणे प्रशासन विभागा अंतर्गत येणाऱ्या सांगली, कोल्हापूर येथे कृष्णा नदीला पूर येवून झालेल्या भिषण अतिवृष्टी मुळे हजारो लोकांचे नुकसान झाले आहे,अनेक लोक बेघर झाले आहे, ह्याची माहिती मिळताच अनेक सामाजिक संस्था मदतीसाठी सरसावल्या आहेत त्याच बरोबरीने समाजिक बांधिलकी जोपासत चंद्रपूर येथिल एस.आर. एम. कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या एन. एस. एस. विभागा च्या वतीने ''एक हात मदतीचा'' हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी अहेरी/चंद्रपूर येथील स्वयंप्रेरणेने तरुणांना एकत्र घेउन काम करणारी सोशल टीम ''जागृत युवा मंच'' तर्फे 80 कपड्यांची मदत पूरग्रस्ताना करण्यात आली. त्यात मुलींचे सलवार, टॉप, नाईट पेंट, मुलांचे टी-शर्ट, लहान मुलांच्या कपड्यांचा सामावेश करण्यात आला होता. सदर कार्यक्रम प्रा. डॉ. सुनील साकूरे, उप प्राचार्य डॉ. नरेंद्र टिकले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रा. सेवा योजना समन्वयक प्रा. डॉ सुभाष गिरडे व प्रा. किरणकुमार मनुरे यांच्या पर्यवेक्षणात घेण्यात आला .या उपक्रमासाठी मंच च्या सल्लागार प्रा डॉ जयश्री कापसे यांचे विशेष सहकार्य लाभले . उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जागृत युवा मंचचे अध्यक्ष राहूल पेंढारकर, प्रशांत रामटेके, सुमित रामटेके, प्रवीण डोंगरे,अक्षय कामीडवार,अगस्टीन गायकवाड़, साई बच्चेवर,उमेश नगराडे,वैभव पोटे, योगेश कोल्हे, राशी उराडे, प्रनीता वावरे,स्वाति मेश्राम,प्रगति चुनारकर,जया दातारकर,मनीषा डुकरे,रानी नारनावरे, तृप्ति अलोने इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
Comments